देवणी/प्रतिनिधी
दि.25/07/2021 रोजी देवणी तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आला.
देवणी येथील शहरातून जाणारा प्रमुख रस्ता तोगरीमोड ते वलांडी निलंगा जाणारा रस्ता गेली दोन वर्षापासून खोदून ठेऊन काम अपूर्ण ठेवले. त्यामुळे आनेक अपघात होत आसून सदर रस्ता तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी सर्व पक्षाच्या वतीने रविवारी रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले.
      गेल्या दीड वर्षापासून सतत आंदोलन उपोषण करण्यात आले तरी देखील या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी शासन व प्रशासन अद्याप या रोडकडे पाठ फिरवत असल्यामुळे आज गेल्या दीड वर्षापासून जवळपास चारशे ते पाचशे लोकांचा अपघात होऊन हात, पाय, फॅक्चर झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे  रोडची अतिशय दूरावस्था झालेली दिसून येत आहे.म्हणून देवणी शहर व तालुक्याच्या वतीने सदर रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.या वेळी  या आंदोलनाच्या मागण्याचे  निवेदन देवणीचे नाईब तहसीलदार विलास तरंगे यांना देण्यात आले.
     या वेळी अंदोलनात अशोक अण्णा लुले, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बाबुरावजी लांडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने,अमित मानकरी, निलेश लांडगे, योगेश तरगरखेडे, श्रीमंतांना लुल्ले, चेतन मिटकरी, शंकर जीवने, सुनील चिद्रवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मानीक लांडगे, दिनेश महिंद्रकर, आडत व्यापारीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डोंगरे, व तसेच शहरातील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या रास्तारोको वेळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.