प्रतिनिधी, १९ जानेवारी २०२२ :- सर्वत्र नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. जळकोट तालुक्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे. 

  लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायत १७ जागांपैकी महाविकास आघाडीला ८, प्रहारला ६ तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस ७, राष्ट्रवादी ४, शिवसेना २, भाजपा १ आणि अपक्ष ३ विजयी झाले आहेत. शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप ९, राष्ट्रवादी ३, शिवसेना ४ आणि एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस १२, राष्ट्रवादी २, अपक्ष २, भाजप १ जागांवर विजयी झाले आहेत.