नागनाथ ससाणे-
दि. १४/०४/२०२३ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. आशिष सोनकांबळे तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. विष्णू कांबळे होते या कार्यक्रमास उदगीर येथील गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशनचे अध्यक्ष परमेश्वर आलगुडवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमा दरम्यान बापूसाहेब कांबळे ज्ञानोबा कीर्तीकर ,अशोक सोनकांबळे, राम नारायण खेडे, प्रमोद सोनकांबळे, नागरबाई वाघमारे ,संगीता सोनकांबळे, अनिता कांबळे, विलास कांबळे, लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशनचे सचिव नागिन बाई आलगुडवार या आदीसह गांधीनगर येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोक विकास मागासवर्गीय फाउंडेशनचे अध्यक्ष परमेश्वर आलगुडवार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्र्याप्रमाणे आपले मूले शिकले पाहिजेत आपल्या मुलांना शिक्षण द्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे असे या कार्यक्रमाचे वेळी बोलताना सांगितले.