मुंबई प्रतिनिधी, ७ जून २०२१ :- जोगेश्वरी पूर्व स्थित श्यामनगर तलाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असल्याने विधानसभा क्षेत्रातील विविध गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था विविध मंडळे, तरुण युवक मित्र मंडळ यांनी रक्तदान केले. यात सफाई कर्मचारी यांनी देखील आपली सामाजिक जाणिवेची जबाबदारी पार पाडीत रक्तदान केले. या शिबिरात 135 रक्ताच्या बाटल्या जमा झाला. या शिबिराचे उद्घाटन आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते तसेच सेव्हन हिल रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महारुद्र कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

         सेव्हन हिल रुग्णालयाच्या मदतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना वाफेचे भांडे, मास्क, रत्नागिरी जिल्ह्याची परिपूर्ण माहिती असलेले पुस्तक तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कोरोनाच्या काळात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कोरोना योद्धांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधत नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवालय कार्यालयाचे उद्घाटन वायकर यांच्या हस्ते करण्यात आलं.