दौंड तालुक्यात वाढत असलेली बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांची कोलमडलेली अर्थव्यवस्था या गोष्टी लक्षात घेता तालुक्यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग तयार होणे आवश्यक असून युवकांना व शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण मिळावे या करिता शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन तालुक्यात कृषी प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभा करावे ही मागणी केली.
      या बाबत कृषीमंत्री भुसे यांनी त्वरीत अहवाल मागवला आहे व तालुक्यातील असणा-या सर्व शेतकरी उत्पादक गटाला सहाय्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप आदी ही उपस्थित होते.