मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

शेतकऱ्यांना तीन लाख बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा शेतकऱ्यांच चांगभलं करणारी आहे, मात्र राज्यात नोकरभरती प्रक्रियेच घोंगड अद्यापही भिजत पडलं आहे, बँका बेरोजगार तरुणाईला कर्ज उपलब्ध करून देण्याची दानत ठेवत नाहीत, सरकार ना नौकरी देतं, ना बेरोजगारी भत्ता देतं मग मविआ सरकारने निवडणूक घोषणापत्रात दिलेली आश्वासन फक्त आश्वासनच राहतील की काय..? शेतकरी आत्महत्या सारखा बेरोजगार आत्महत्या हा विषय वाढत गेला तर नवल वाटायला नको.