प्रतिनिधी:अमोल राठोड

      दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा या गावची कोरोना मुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 40 ते 50 गावांची कोरोना मुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. कोरोना मुक्त गाव झाल्याने या कामगिरीत आपलं कार्य चोख बजावलेल्या शैक्षणिक, आरोग्य विभाग, पोलीस आणि प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एस पी तेजस्विनी सातपुते या होत्या. या कार्यक्रमादरम्यान सातपुते यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं