प्रतिनिधी, ९ डिसेंबर २०२१ :- उटी कुन्नूरजवळ निलगिरी जंगल मध्ये Mi17V5 हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जवानांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण देश हळहळला. बिपिन रावत यांच्या जाण्याने सरकारसुद्धा गोंधळले तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाला.

     Mi17V5 हे लष्कर वापरत असलेला हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित मानलं जातं. मात्र तरीही अशा हेलिकॉप्टरचा अपघात होणे हे खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. भारतात गेल्या काही वर्षात या गटातील हेलिकॉप्टर्सने झालेले अपघातही चर्चेत आले होते. 

   Mi17V5 हे रशियन हेलिकॉप्टरची उपकंपनी काझान हेलिकॉप्टर्स विकसित केला आहे. भारतीय हवाई दलाकडे आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या Mi सीरिज हेलिकॉप्टर्स मधला हेलिकॉप्टरचा हा सर्वात प्रगत वर्ग आहे. भारतीय हवाई दल या मालिकेतील अनेक हेलिकॉप्टर वापरत आहेत. ज्यामध्ये Mi 26, Mi 24, Mi 17 आणि Mi17V5 यांचा समवेश आहे. हेलिकॉप्टर चे मुख्य कार्य म्हणजे सैन्याची वाहतूक आणि वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा इतर कामांसाठी वापर केला जातो. हे निर्वासन आणि बचाव कार्य इत्यादींमध्ये वापरले जाते. गरज पडल्यास हलकी शस्त्रे वापरून आक्रमणाची भूमिकादेखील निभावण्यात अग्रेसर आहे. 

   हे Mi सिरीज हेलिकॉप्टरचा जगभरातल्या अनेक देशांमध्ये वापर केला जातो. या हेलिकॉप्टरची कामगिरी विश्वासार्ह आहे. Mi-8च्या एअरफ्रेमच्या आधारे हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली आहे. पण, त्यात पूर्वीपेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर अतिशय थंड ते अतिशय उष्ण वातावरणात सहज उडू शकते. हेलिकॉप्टरचं केबिन बरीच मोठी आहे, ज्याचं क्षेत्रफळ 12 चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. हेलिकॉप्टरची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, की मागील बाजूने सामान आणि सैनिक जलद उतरवता येतील. हेलिकॉप्टरमध्ये 4 मल्टीफंक्शन डिस्प्ले आहेत. ऑन बोर्ड वेदर रडार आणि ऑटो पायलट सिस्टमदेखील आहे, जी पायलटला मदत करते. Mi 17 V5 देशाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन अपग्रेड केलं गेलं आहे.

     २५ जून २०१३ रोजी उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरानंतर मदतकार्यात सहभागी झालेल्या Mi 17 V5 हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, तेव्हा या घटनेमध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता. असाच एक प्रकार ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशात Mi 17 V5 हेलिकॉप्टरच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. ३ एप्रिल २०१८ रोजी Mi 17 V5 हेलिकॉप्टरचं केदारनाथ मध्ये क्रॅश लँडिंग करावं लागलं होतं. त्यात काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. भारतीय हवाई दलाने एप्रिल २०१९ मध्ये Mi 17 V5 हेलिकॉप्टर्स च्या रीपेरींग आणि देखरेखीसाठी चंदिगढ मध्ये एक केंद्र ही स्थापन केलं होतं.

        Mi 17 V5 हे लष्कर हेलिकॉप्टर इतकं अपग्रेडेड असून सुध्दा हवामानाच्या बिघाडामुळे कोसळलं अस प्राथमिक माहितीत सांगण्यात आलं. मात्र या अपघाताचे चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या चौकशीत काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही घटना मन हेलावणारी असून या घटनेचा तपास होणं खरंच गरजेचं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एक यंत्र असते. हे यंत्र हेलिकॉप्टरमध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील तर सूचित करतं मात्र जेव्हा ही दुर्घटना तांत्रिक आणि हवामानाच्या बिघाडामुळे झाली असं सांगण्यात आले. मात्र ही कुठेतरी बाब खटकण्यासारखी आहे की हे यंत्र असूनही ही दुर्घटना घडली कशी?