15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्या प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्वांना प्रथम वंदन
आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो .अशी भावना प्रत्येक जण व्यक्त करत असते पण आज रोज प्रत्येक राज्यात ज्या राजकीय पक्षाच्या हाती राज्य सरकार आहे त्यांची भाषा कोणती आहे तुम्हाला सांगण्याची गरज आहे की सांगावेच लागेल(हिंदू सरकार)आम्ही हिंदुत्ववादी हे शब्द मुख्यमंत्री, राज्यपाल, देश चालवणारे देशाचे पंतप्रधान यांचे शब्द असतात मग आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो तर अशा शब्दांमुळे देशात राहणाऱ्या इतर समाजावर याचा काहीच परिणाम होत नसेल का..?लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी देशात जातीभेद निर्माण करणे,भ्रष्टाचार करणे,अशिक्षित, गुन्हेगारी समाज निर्माण करणे नाही तर त्यांचे प्रथम कर्तव्य देशातील एकात्मता अबाधित ठेवणे आहे,देशातील सर्वधर्मसमभाव ठेवण्यासाठी सर्वाना मोफत शिक्षण देणे,मोफत आरोग्य सेवा देणे,सुसज्ज रस्ते देणे,शुद्ध पाणी देणे,भटक्या जमातीना ,घरापासून वंचित असणाऱ्यांना घरे देणे,बेरोजगारांना नौकरी देणे मुख्य जबाबदारी हे असताना आज देशात नेमके काय घडत आहे व या पुढेही असेच घडत राहणार का..?तुम्ही देशाचे जागृत नागरिक म्हणून एक विचार कराल का.? खरंच आज तुमच्या देशातील लोकप्रतिनिधी देशातील सर्वधर्मसमभाव ठिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का.? तुम्हाला तुमच्या हक्काच्या सुविधा मिळत आहेत का.? खरंच तुम्हांला स्वातंत्र्य मिळाले आहे का..? की आज ही तुम्हांला गुलामगिरीशी तोंड द्यावे लागत आहे.तुमचे अधिकार मिळवण्यासाठी, मूलांना दर्जेदार मोफत शिक्षण घेण्यासाठी, दर्जेदार मोफत आरोग्य सेवा घेण्यासाठी, कधी पोलीस स्टेशन मध्ये गेले तर तात्काळ तुमची दखल घेतली जात नाही,आज ही ग्रामीण भागात साधं घरकूल योजना पैसे दिल्या शिव्या मिळत नाही,साधं पैसे दिल्या शिवाय पोलीस स्टेशन,न्यायालयात न्याय मिळत नाही मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरे करून आणखी कोणते न्याय मिळणार आहे.आता सत्ताधारी लोकप्रतिनिधी बोलतील ,त्यांचे समर्थन करणारे बोलतील देशातील नागरिकांनी सकारात्मक विचार केला पाहिजे आम्ही देशाचे नाव जगा पातळीवर घेऊन गेलो आहे.नागरिकांनी विचार केला पाहिजे आपल्या देशाचे नाव जगा पातळीवर होते म्हणून तरी आपल्या देशावर कित्येक देशातील राज्यांनी येथे येऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला.
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना हे विसरून चालणार नाही मोफत शिक्षण देणाऱ्या संस्था बंद पडत आहेत कित्येक शाळेला शिक्षक नाहीत कित्येक शाळेला जाण्यासाठी रस्ता,देशातील पूर्ण सिस्टीम भ्रष्ट होत आहे. (भ्रष्ट झाली आहे) धर्माच्या नावाखाली लोकांचे जीव जात आहेत,बलात्कार, अट्रोसिटी सारखे गुन्हे दाबले जातात,खोट्या गुन्ह्यात अडकून नागरिकांचे जीवन नष्ट केले जाते.आज ही नागरिकांना तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी भीती निर्माण झाली आहे हे वास्तव आहे.देशात आपले अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणे,धरणा देणे यावर बंदी घातली जाते पण आपण विसरत आहोत असेच आंदोलन करून आपण शिक्षण हक्क,पाणी पिण्याचे अधिकार, गुलामगिरी मधून स्वातंत्र्य मिळवले आहे मग आता बंदी का..?देशात जनतेच्या हितापेक्षा देशाला कर(टॅक्स) जास्त कसा मिळेल पाहिले जात यामुळे दारू,गुटखा,सिगरेटच्या प्रमाणात वाढ होत आहे त्यात शहरी भागात गांजा,चेरस आहेच आपल्या देशातील लाखो नागरीक यामुळे मृत्यू पडत आहेत.देशातील नागरिक शिक्षित कमी अशिक्षित जास्त होत आहेत,रोजगार कमी पण बेरोजगारी जास्त होत आहेत यामुळे खरंच वाटतं का आजही आपला देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे.एक देशाचा नागरिक म्हणून नक्की विचार करा.लोकप्रतिनिधी देशात जातीभेद निर्माण करत असतील तर देशाचे जागृत नागरिक म्हणून त्याचा विरोध करा.लोकप्रतिनिधी हा आपला सेवक आहे आपण त्याचे गुलाम नाही हे लक्षात ठेवा तरच आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळेल.जाता जाता ज्यांना आजही घरे नाहीत सरकारने त्यांना घरे द्यावी तरच ते घरावर आपली शान,आपला सन्मान राष्ट्रध्वज लावतील व आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करू...
जय हिंद
मुख्य संपादक, संचालक-अमोल भालेराव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना याकडे दुर्लक्ष करून कसे चालणार..?

Source:
Post Comment