हिंगोली प्रतिनिधी जगणं पाटील

  सेनगाव येथील पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची त्यांच्यावर झालेल्या विविध तक्रारीवरून प्रशासकीय बदली पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी रद्द करावी या एकमुखी मागणीसाठी शेकडो सेनगाववासीयां तर्फे रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
         सेनगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली हिंगोली येथे प्रभारी गृह उपविभागीय अधिकारी या पदावर करण्यात आली, या जागी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी सेनगाव पोलीस ठाण्याची सूत्र हाती घेता सेनगाव शहर हद्दीत कोरोना महामारीच्या काळात अतिशय दमदार व चोख कामगिरी केलेली आहे, त्यांनी कोणताही पक्षपात न करता कायदा मोडणारे व्यक्तीवर धडक कारवाई करून आपले कर्तव्य बजावले आहे, या काळात लग्न सोहळा असो की अंतिम संस्कार, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कलम 144 संचारबंदीचा त्यांनी कडक अंमल केला, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कायद्याचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली असल्याने असंतुष्ट कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड करून त्यांची बदलीची मागणी केली होती, परंतु सदर बदली रद्द व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी, मराठा शिवसैनिक सेना यासह सर्वसामान्य सेनगाव वासियांनी व हजारो कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस अधीक्षक यांना देऊन त्यांची बदली रद्द करण्याची एकमुखी मागणी केली आहे,
      या बदली संदर्भात सेनगाव शहरात पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांना पुन्हा सेनगाव ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी परत पाठवावे या मागणीसाठी सेनगाव शहरासह ठाणे हद्दीतील शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टी पॉइंट येथे सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते, या रास्ता रोको आंदोलन दरम्यान काही तास वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा उभ्या राहिल्या होत्या. आंदोलनकर्त्यांची मागणी लक्षात घेता ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आंदोलनकर्त्यांना दूरध्वनीवरून संभाषण केले असून, मी येत्या दोन दिवसात सेनगाव ठाण्याला भेट देऊन योग्य ती चौकशी करणार असून व त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपला रस्ता रोको तूर्त मागे घेतला, 
         यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अशोक ठेंगल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गंगाराम फटांगळे, गणेशदादा जारे, गंगाधर गाढवे, अंकुश तिडके, झनक महाराज तिडके, माजी नगरसेवक अजय इटकरे, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस हिम्मत राठोड, तालुका युवा सरचिटणीस विजय धाकतोडे पाटील, राजू, खाडे, शेख फजल पुसेगावकर यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, बंदोबस्त कामी सेनगाव पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, रमेश कोरडे, चिंतारे, माधव शिंदे, सुभाष बांगर यासह सेनगाव पोलीस कर्मचारी यांच्या तर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला होता.