सर्वांसाठी घरे, या संकल्पनेतून देशात पंतप्रधान आवास योजना  राबविण्यात आली. मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनेक लाभार्थ्यांना अद्याप  त्यांचे निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली होती केंद्राच्या निधी अभावी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ही योजना रखडली होती त्याची तात्काळ दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील सहा नगरपालिका व 5 नगरपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा  यासाठी हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या विनंतीचा पाठपुरावा मी केंद्रीय शहरी विकास मंत्री हारदिप सिंग पुरी यांची भेट घेऊन मतदार संघासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला  त्यात हिमायतनगर शहरासाठी सर्वाधिक निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले    हिमायतनगर शहरासाठी नगर पंचायत अंतर्गत  1225 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेची मान्यता मिळाली होती त्यापैकी अनेक लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा चौथा हप्ता लवकरच आपल्याला मिळेल या आशेने त्यांनी आपले घरकुल बांधकाम पूर्ण केले होते पण कोरोणा महामारीच्या काळात मागील कित्येक दिवसापासून केंद्र शासनाच्या चौथ्या हप्त्याचे अनुदान रखडले असल्याचे नगर पंचायत प्रशासना कडून सांगण्यात आले होते त्यामुळे दीं.13 जून रोजी हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील हे हिमायतनगर येथील ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यासाठी आले असता उपस्थित पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान आवास योजने संदर्भात माहिती विचारली असता त्यांनी असे सांगितले की हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यात हिमायतनगर 6.61,हिंगोली 6.43,वसमत 4.18, कळमनुरी 2.42, उमरखेड 3.88, हदगाव 5.21, किनवट 4.10, माहूर 5.02, औंढा नागनाथ 4.72, महागाव 3.71, व सेनगाव साठी 2 कोटी 98 लाख असा 6 नगरपालिका व 5 नगर पंचायतचा रखडलेला निधी मिळून अंदाजे 50 कोटीच्या मंजुरीचे केंद्रीय शहरी विकास मंत्री हारदिप सिंग पुरी यांनी पाठवलेले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील  यांच्या नावे असलेले पत्र त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना  दिले या प्रसंगी त्यांनी असे ही सांगितले की अगोदर पासूनच मी ह्या बाबीचा पाठपुरावा करत आहे आणि हिमायतनगर नगरपंचायतीचा रखडलेला हप्ता हा केंद्राचा हप्ता असल्यामुळे तो राज्याच्या नेत्यांनी मंजूर करून आणण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही, दुर्देवाने काही नेते ह्याचे श्रेय घेत आहेत ? आणि एका म्हणीप्रमाणे हातच्या काकणाला आरसा जसा लागतो!  तसे हातचे काकण पाहायला आरसा पण लागतोच असे असे म्हणत त्यांनी विरोधकांचा सडकून समाचार घेतला ,तात्पुरते फोन लाऊन कार्यकर्त्यांचे समाधान होत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्र्यांनी देलेल्या मंजुरीचे पत्र त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिले
केंद्र सरकारच्या निधीचे इतरांनी श्रेय घेऊ नये :- माजी नगराध्यक्ष
हिमायतनगर शहरातील सर्वांसाठी घरे, या संकल्पनेतून मागील अडीच वर्षाच्या काळात शासना कडून 1225  घरकुलांचे मंजुरी आम्ही करून आणली, कोरोना महामारीमुळे अनेक लाभार्थ्यांचा केंद्र शासनाकडून येणारा चौथा हप्ता अडकला होता त्या हप्त्याचा सुद्धा मी वेळोवेळी  खासदार हेमंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होतो तो शेवटी पूर्णत्वास आला आणि शहरातील अनेक घरकुल धारकांना चौथ्या हप्त्याचा निधी लवकरच नगरपंचायत कडून वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी कृपया कोणत्याही कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी चुकीच्या अफवेला तोंड फोडू नये ! ही विनंती करण्यात आली