नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदिच्या दिघी येथे महसुलने जप्त केलेली रेती प्रमुखाच्या साक्षीने उचलून शहरातील रुख्मिनी नगर भागात विनापरवाना आणून टाकण्यात आली होती, त्यावरून शिवसैनिक राम गुंडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर महसुलने अल्प साठे जप्त करून हजारो ब्रास रेतीचे ढिगारे चोरट्यांना घेऊन जाण्यासाठी मोकळे सोडले. त्यानंतर वटफळी येथील कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा दिला होता, त्यांनतर कार्यवाहीत चालढकल करून आता जप्त केलेली रेती देखील चोरून नेण्यासाठी उघड्यावर टाकली आहे.  स्थानीक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने जप्त साठा उचलण्याची धडपड सुरू असल्याचे व्हिडीओ येथील प्रहार जनशक्तीचे युवा तालुकाध्यक्ष विद्यानंद देवसरकर यांनी व्हायरल करून शासनाला अधिकारी व माफियांनी मिलीभगत करून कसा चुना लावला जातो हे उघड केले आहे