रामदास चव्हाण महाड रायगड

      महाड तालुक्यातील केंबूर्ली येथील शिक्षक महिलेला माहेरून हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती सासु व सासऱ्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला शिक्षिका आक्सा मूइज  घोले वय 25 रा. केंबुर्ली यांनी याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 4 डिसेंबर 2021 ला  आक्सा व तिचे पती मुईज घोले यांचा विवाह झाला होता तेव्हापासून आतापर्यंत पती, सासू व सासरा पीडित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. पीडित महिलेच्या पतीने आपल्या पत्नीला तलाक देण्याचा देखील प्रयत्न केला व आपल्या मोटर सायकलवर घेऊन नदीतून ढकलून ठार मारण्याची धमकी देखील दिली. तसेच माहेरून टीव्ही,फ्रिज, वाशिंग मशीन अशा अनेक इतर वस्तूंच्या मागणीचा तगादा  लावत तिचा मानसिक छळ केला. या सर्व जाचाला कंटाळून अखेर पीडित महिलेने थेट महाड शहर पोलीस ठाणे गाठलं व 4 फेब्रुवारी 2023 ला महाड शहर पोलीस ठाण्यात मूईज फारूक घोले, फारुख अब्दुल रेहमान घोले व खातीजा फारूक घोले या तिघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अक्षय जाधव हे करीत आहेत.