राज्यात आजपासून काही प्रमाणत निर्बंध शितील होत आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे दिलासा देणारे असून सध्या स्थिती सुधारत असल्यानं प्रशासन दिलासादायक निर्णय घेत आहे. सोमवारीही राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे आकडे दिलासादायक असल्याचं पाहायला मिळाला आहे. सोमवारी राज्यात 15 हजार 077 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा यापेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे 33 हजारांच्या वर गेला. 

कोरोनाच्या समाधानकारक आकडेवारीमुळे संपूर्ण राज्यात दिलासादायक स्थिती असल्याचं चित्र आहे. काही जिल्हे अजूनही याला अपवाद असले तरी प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणीही परिसथिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 184 येवढा आहे. अक्टिक रुग्णांचा आकडाही अडीच लाखांवर आला आहे. रुग्ण बरं होण्याचे प्रमाण 93.88 टक्के झालं आहे.