सध्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण उद्यापासून राज्यभरात मान्सून पूर्व पावसाळा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेदशाळेने तसा इशारा सुद्धा दिला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहेत. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दोन जून पर्यंत सर्वत्र पावसाच्या सरी बरण्याची शक्यता आहे. 

पुणे शहरात शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाकडून शनिवारी सकाळीच तसा इशारा देण्यात आला होता. 

सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून हजेरी लावेल. त्यासोबतच 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.