पंढरपूरच्या वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर असलेल्या पारधी वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारूच्या अड्ड्यावर कारवाई साठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. 

या हल्ल्यात वेळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाकडून हल्ला करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.