बारामतीत जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या पातीवर गोळीबार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. माळेगाव येथे हा गोळीबार झाला. या घटनेनंतर रविराज तावरे यांना उपचारासाठी बारामती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तालुक्यातील माळेगाव येथे हा गोळीबार केला. बारामतीतील तालुक्यातील माळेगाव येथील ऑडी मध्ये जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे हे संभाजीनगर या ठिकाणी वडापाव घेण्यासाठी थांबले असताना मोटासायकल वर आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती समोर आली आहे. रविराज तावरे यांना जखमी अवस्थेत बारामती रुग्णालयात दाखल केले, त्यांना फुप्फुसांमध्ये एक गोळीबार लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबार का करण्यात आला याचा पुढील तपास पोलिस उपाधीक्षक नारायण शिरगावकर हे करीत आहेत. गोळीबाराची बातमी समजताच तेथील नागरिकांची रुग्णालया बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती.