कोरोना इतक्याच प्राणघातक असलेल्या मयुकोर मायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलव होत आहे. या आजारावर मोफत उपचार करावे आशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत नुकतच त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकांना यावर उपचार मोफत करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली. 

मंदा म्हात्रेंच्या या मागणीवर नवी मुंबई पालिका आयुक्तांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. म्यूकोर मायकोसिसीवर महापालिकेमार्फत मोफत उपचार करू. तसेच नेरूळ येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल येथे म्युकोर मायकोसीस या आजारावर मोफत उपचार करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.