कोरोना काळात विमान प्रवास पुन्हा एकदा महागणार आहे.  सरकारने डोमेस्टिक फ्लाईटसच्या भाड्याची लोअर लिमिट 13 ते 16 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात देखील नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान प्रवासाच्या भाड्याची किमान मर्यादा 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीमध्ये लोअर प्राईस बँडमध्ये 10 टक्के तर हायर प्राईस बँडमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे 1 जूनपासून जर तुम्ही विमानप्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला अधिकच भुरदंड पडणार आहे. 

विमान प्रवास भाड्यात झालेली ही वाढ 1जून पासून लागू होणार आहे. दरम्यान प्रवास भाड्याची कमाल मर्यादा सध्या स्थिर आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एअरलाईन कंपन्यांना मदत मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान उड्डाणांची संख्या पुन्हा कमी झाली होती.