प्रतिनिधी, २८ जुलै २०२१ :- मुसळधार पावसानं कोकणात धुडगूस घातला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राजकिय पक्षातील नेते कोकणात दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं. “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

   नारायण राणे हे प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांबवल्याचा अंदाज आहे.

 °   (अधिकाऱ्यांना उद्देशून) तुम्हाला सोडू का, त्या मॉबमध्ये सोडू का आता?

  ° (प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत) थांब रे मध्ये बोलू नको

(प्रवीण दरेकरांनी हलकीशी मान डोलावली)

(पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून) मॉबमध्ये सोडून येऊ?

  ° काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत

   ° मग, त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं आणि तुम्ही हसताय. दात काढताय?

(अधिकाऱ्याचं उत्तर – हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे)

   ° इथं काय करताय. इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही

चला दाखवा ऑफिस तुमचं कुठं आहे.