जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.
याचेच औचित्य साधत पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी गेली अनेक वर्ष  टिटवाळा येथील योगदान फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात . 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जात असताना . या दिनाचे औचित्य साधत पक्षांना प्यायला पाणी मिळावे म्हणून नागरिकांना पाण्याचे पॉट मोफत वाटप करण्यात आले. या आधीही योगदान फाऊंडेशन लोकवस्ती असललेल्या ठिकाणी ,सोसायटी मध्ये असे उपक्रम राबविले आहेत.  त्यांच्या या कार्याची दाखल घेत अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत .  चिमण्यांची कमी होत चाललेली संख्या पाहता त्या वाचविण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. वाढते  शहरीकरण आणि पर्यावरणावर त्याचा होणारा विपरीत परिणाम या कारणाने  चिमण्यांचे स्थलांतर होत आहे व काही पक्षांची जाती नामशेष देखील होत आहे.

यासाठीच याबाबत जनजागृती व्हावी तसेच पक्षांनी आपल्याला आपल्या घरांसाठी त्यांचे जंगल दिले मग आपणही त्यांच्या घरासाठी प्रयत्न करायला हवेत हा उदात्त हेतू ठेवून त्यांचे संवर्धन करण्याचे काम आपण करत असल्याचे यावेळी योगदान फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.  पक्षी संवर्धनाचा संदेश देत  जागतिक चिमणी दीन साजरा केला. 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कवी प्रदीप पवार , अमोल सावंत, शैलेश गिरी ,पक्षी मित्र अरविंद योगी उपस्थित होते.
तसेच योगदान फाउंडेशन ट्रस्ट अध्यक्ष मदन चव्हाण सचिव रितेश कांबळे सभासद सुनील शिंदे , पक्षी मित्र संजय जाधव , चेतन गोणबरे,  प्राजक्ता गोणबरे, नेयाज शेख, धनश्री सुर्वे,प्रणाली यादव,मीनाक्षी पांडे, कीमी ,प्रेरणा बाला, सिध्दी सुर्वे. या सर्वांनी मिळून  नागरिकांना चिमणी संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच चिमण्यांना वस्तीकरण  झालेल्या भागामध्ये मुबलक पाणी मिळावे म्हणून मातीचे वॉटर पॉटचे नि शुल्क वाटप केले.