आम्हांला साथ हवी आहे

पत्रकारिता क्षेत्रात जागृत महाराष्ट्र चनलच्या माध्यमातून काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभ अनुभवायला आले. संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या अनेक प्रतिनिधींच्या माध्यमातून महाराष्ट्रातले अनेक प्रश्न , समस्या , घडामोडी जवळून पाहता आल्या. भावतालची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक लोक न्यायाच्या प्रतिक्षेत याचना करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून याला वाचा फुटत आहे. पण या माध्यमांचा हवा तसा वापर खरच होतोय का ? परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही ते योग्य पद्धतीने वापरतोय का ? तर याचे उत्तर तुम्हालाही माहित आहे. म्हणूनच इथल्या तळा-गाळातल्या लोकांचे , इथल्या माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी .... त्यांच्या न्याय्य हक्कासाठी वर्षभरापुर्वी ' जागृत महाराष्ट्र ' या चनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आलो.
आपला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्ही आणखी नवी उर्जा घेऊन काम करत आहोत करत राहू..... कुठल्याही प्रकारची भीड न बाळगता निर्भीडपणे इथल्या शोषणकर्त्या व्यवस्थेला बातम्यांच्या माध्यमातून धडक देत आहोत . मात्र या प्रवासात अनेक अडचणी आल्या येत आहेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या सामन्य माणसांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा मोठा खडक आहे .... आमच्या लहानश्या प्रयत्नांनी तो फुटणार नाही पण ठिसूळ नक्कीच होईल... येणाऱ्या पिढीला फोडायला सोप्पा जाईल. आपण हे ठिसूळ करण्याचे तरी काम करू.....ही ख-या अर्थाने एक चळवळ आहे. ..... आपल्या आधी कोणीतरी चालवत होत आणि आपल्या नंतरही कोणीतरी चालवत राहील या परिवर्तनवादी चळवळीत आपले योगदानही महत्वाचे आहे. यासाठी आपण आम्हला जमेल तशी जमेल ती मदत करा असे आवाहन आम्ही या माध्यमातून आपल्याला करत आहोत .


सहकार्य करा.

Bank Name: CORPORATION BANK
A/C No: 510101006742304
A/C Holder Name: JAGRUT MAHARASHTRA NEWS CHANNEL
IFSC Code: CORP0003334
IFSC Code: 400017095