राज्यात निवडणूक प्रचारात नेत्यांच्या बॅगांची तपासणी, विरोधकांनी साधला निशाणा

राज्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून नेत्यांचे दौरेही जोरात सुरू आहेत. या काळात प्रचारासाठी नेते हवाई मार्गाचा वापर करत आहेत, त्यामुळे हवाई उड्डाणांच्या सोयीचा लाभ घेतला जातोय. निवडणूक काळात पैशांचा अपहार होऊ नये, म्हणून विविध ठिकाणी कठोर तपासणी केली जात आहे. हॅलिपॅडवरून प्रवास करणाऱ्या नेत्यांच्या बॅगांचीही तपासणी होत आहे.

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती, त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे पालघर दौऱ्यावर असताना त्यांची बॅग तपासण्यात आली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणत म्हटले, “माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही.” उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरून शरद पवारांनी देखील टीका केली होती.

अजित पवार यांनी देखील आपल्या तपासणीबद्दल प्रतिक्रिया देत एक्स (मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) वर व्हिडिओ शेअर केला. ते म्हणाले, “आज माझ्या बॅग व हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मी त्यांना पूर्ण सहकार्य केलं. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक आहेत, आणि कायद्याचा आदर करून निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना सहकार्य करायला हवं.”

विरोधकांनी या तपासणीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उफाळण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

    महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू