जागतिक मच्छिमार दिन: मढ कोळीवाड्यात परंपरा, उत्साह आणि एकतेचा उत्सव

मढ, २१ नोव्हेंबर:
जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून मढ कोळीवाड्यात गुरुवारी सायंकाळी वांजरे गल्ली जेट्टीवर एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ मढचे लोकप्रिय समाजसेवक  संजय  सुतार यांच्या हस्ते तिवर (कांदळवण) वृक्षाला श्रीफल अर्पण करून झाला. परंपरेला साजेसा असा प्रारंभ गावातील कोळी महिलांच्या आरती व पूजेनं करण्यात आला. 
सागर बॅंड पथकाच्या कोळी गाण्यांच्या सुरेल ठेक्यावर कोळी महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी सागर बॅंड पथकाचे मास्तर मधूकर नगी आणि मा. विष्णू कोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमात मच्छिमार समाजातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी,मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी सोसायटी लि. अध्यक्ष संतोष कोळी,मानद सचिव अक्षय कोळी, तसेच हरबादेवी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि सचिव दिपक कोळी यांचा समावेश होता. संस्थांचे संचालक सोमनाथ कोळी, मोजेस कोळी, नितिन कोळी यांच्यासह सौ. अनिता कोळी, सौ. दर्शना धजे आणि मोरेश्वर कोळी यांसारख्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमात योगदान दिले. 

कार्यक्रमासाठी कोळी समाजातील महिला, पुरुष, युवक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळी समाजाच्या परंपरा जपत, त्यांच्या जीवनशैलीचा आणि एकतेचा हा उत्सव ठरला. 

कार्यक्रमाच्या निमित्ताने तिवर वृक्षारोपणावर भर देत समुद्र किनाऱ्याच्या संवर्धनाचा संदेश दिला गेला. यामध्ये सहभागी सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. 

हा कार्यक्रम मच्छिमार समाजाच्या योगदानाची आठवण करून देणारा आणि परंपरा, एकता, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. 

  • Related Posts

    महाराष्ट्र दिवस: का साजरा केला जातो?

    महाराष्ट्र दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत, मुंबई प्रांताचे विभाजन…

    मालाड-मढ येथे गुड फ्रायडेला ख्रिश्चन बांधवांसाठी पाणी वाटप, शाहू फुले आंबेडकर संस्थेचा एकतेचा संदेश

    मालाड: मढ येथे ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला गुड फ्रायडे हा पवित्र दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदान आणि कॅलव्हरी येथील मृत्यूचे स्मरण करणारा हा दिवस ख्रिश्चन…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू