शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!

‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला आहे. त्याच्या वाढदिवशी लाखो चाहते येथे जमून त्याला शुभेच्छा देतात.
मात्र, आता शाहरुख खान काही काळासाठी ‘मन्नत’ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ‘मन्नत’मध्ये नुतनीकरणाचे मोठे काम सुरू होणार आहे. या कामासाठी शाहरुखला कोर्टाकडून अधिकृत परवानगी मिळाली असून, हे काम यावर्षी मे महिन्याच्या आधी सुरू होणार आहे. या नुतनीकरणाच्या अंतर्गत बंगल्याचा काही भाग विस्तारीत केला जाणार आहे. या नव्या विस्तारामुळे ‘मन्नत’ अधिक भव्यदिव्य आणि आलिशान दिसणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गौरी खानने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून ‘मन्नत’ला दोन अतिरिक्त मजले जोडण्याची परवानगी मागितली होती. या विस्तारामुळे बंगल्याचे बांधकाम क्षेत्र ६१६.०२ चौरस मीटरने वाढणार आहे. ‘मन्नत’ हा ग्रेड ३ ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असल्याने कोणताही संरचनात्मक बदल करण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असते. आता ही परवानगी मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुतनीकरणाचे काम सुरू होणार आहे.
या नुतनीकरणाच्या कामासाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंगल्याच्या काही जुन्या भागांचे देखील पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे काही भाग अधिक मजबूत आणि आधुनिक केला जाणार आहे.
कामाच्या कालावधीत बंगल्यात फक्त कामगार उपस्थित असतील, त्यामुळे शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब काही काळासाठी भाड्याच्या घरात राहणार आहे. शाहरुख आणि गौरी खान यांनी आधीच काही पर्यायांवर विचार केला असून लवकरच नव्या घरात स्थलांतर होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा आपल्या आवडत्या ‘मन्नत’मध्ये परत येतील.
शाहरुख खानचे चाहते मात्र या नुतनीकरणाच्या बातमीने उत्सुक झाले आहेत. भविष्यात अधिक भव्य आणि सुधारित ‘मन्नत’ पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. हे नुतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हा बंगला अधिकच देखणा आणि आकर्षक होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Posts

पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…

Leave a Reply

You Missed

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू