बलात्कारास विरोध; १९ वर्षीय तरुणाकडून ३६ वर्षीय विवाहितेच्या शरीरावर १५हून अधिक वार!

पुण्यातील स्वारगेट परिसरातील घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करून विरोध केल्याने नराधमाने तिला निर्घृण मारहाण केली. तिचा चेहरा विद्रूप करत शरीरावर १५ पेक्षा जास्त चाकूचे वार केले.

अभिषेक तात्याराव नवपुते (वय १९, रा. घारदोन) या आरोपीने अनेक दिवस विवाहितेचा पाठलाग केला होता. २ मार्च रोजी संध्याकाळी, जेव्हा ती शेतात काम करत होती, त्यावेळी त्याने तिचा गळा दाबून बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करताच, संतापलेल्या आरोपीने तिला जमिनीवर आपटले आणि चेहरा, पोट, डोके, मान, हातावर अमानुष वार केले. इतकेच नाही, तर ती बेशुद्ध पडल्याचे समजून तिच्या डोक्यात दगड घालून पसार झाला.

दरम्यान, शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सासूला सून रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. कुटुंबाने तिला तातडीने शहरातील रुग्णालयात नेले. एका रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिल्याने तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्या शरीरावर तब्बल ५२ टाके पडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी शेतात लपून बसला होता. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि उपअधीक्षक पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविकिरण दरवडे आणि उपनिरीक्षक सतीश पंडित यांच्या पथकाने त्याला अटक केली.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना धक्कादायक असून, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  • Related Posts

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    छत्रपती संभाजीनगर: वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात (Grishneshwar Jyotirlinga Temple) श्रावण महिन्यातील (Shravan) वाढत्या गर्दीमुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनाची प्रक्रिया जलद करण्यासाठी या कालावधीत मंदिरात अभिषेक करण्यास बंदी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू