दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

औरंगजेबच्या कबर हटवण्याच्या मागणीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केल्यानंतर सोमवारी रात्री महाल परिसरात दोन गटांमध्ये तणाव वाढला. या संघर्षामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाली. चार तासांहून अधिक काळ चाललेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला.

या घटनेनंतर नागपूर शहरातील संवेदनशील भागात तणाव निर्माण झाला. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

सोमवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेत अनेक वाहनांची तोडफोड झाली, काहींना आग लावण्यात आली, तसेच दुकानांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असून, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, नागपूर पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • Related Posts

    नागपूर : सासरच्या छळाचा थरारक प्रकार, सुनेला विजेचा शॉक देत मारहाण

    नागपूरच्या अष्टविनायकनगर येथे एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला विजेचा शॉक देत तिची निर्घृण मारहाण केली. पीडित महिलेचे नाव प्रीती असून, तिला शॉक दिल्यानंतर घरात…

    “राजकीय खेळीचा उलटा परिणाम; मनसेला दिलेली फूस, भाजपासाठी डोकेदुखी..!”

    नागपूर – राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अप्रत्यक्ष पाठींबा दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, मनसेच्या आंदोलनाने…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार