दिल्ली: हुंड्याच्या लोभाने घेतला शिक्षिकेचा बळी, पती आणि सासऱ्याला अटक…

दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातील ३१ वर्षीय महिला शिक्षिकेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाजियाबादच्या वसुंधरा परिसरात आपल्या राहत्या घरात या शिक्षिकेने आपले जीवन संपवले. घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. कुटुंबीयांनी हुंड्याच्या मागणीचा आरोप करत तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

भावाला भावनिक संदेश, सुसाईड नोटमध्ये पतीवर आरोप

मृत्यूपूर्वी शिक्षिका अन्विता शर्मा यांनी आपल्या भावाला एक भावनिक संदेश पाठवला होता. त्यामध्ये तिने लिहिले, “आय लव्ह यू भाई. प्लीज मला माफ कर आणि सर्वांची काळजी घे.” तिच्या कुटुंबीयांच्या मते, लग्नानंतर महिनाभरातच तिला त्रासाला सामोरे जावे लागले. सततच्या वादामुळे तिने घटस्फोटाचा विचार केला, परंतु पती गौरव कौशिक याने तिला पुन्हा घरी परतण्यास भाग पाडले.

सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासे

पोलिसांनी घटनास्थळी दीड पानी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात अन्विता यांनी आपल्या पतीच्या वागण्याबद्दल तक्रार केली आहे. तिने लिहिले आहे, “माफ करा, मी आता हे सहन करू शकत नाही. माझ्या पतीला सुंदर, घरकाम करणारी आणि पैसे कमावणारी पत्नी हवी होती. मी सर्व प्रयत्न केले, पण त्याला नेहमीच माझ्यात चुका दिसत होत्या.”

तिने पुढे लिहिले, “तो प्रत्येक वादात मला आणि माझ्या कुटुंबाला टोमणे मारायचा. त्याने माझ्या नोकरीशी लग्न केलं, माझ्याशी नाही.” तिने हेही नमूद केले की पतीने तिच्या सर्व बँक खात्यांवर नियंत्रण मिळवले होते आणि तिला पुढील शिक्षण घेण्यास मज्जाव केला होता.

कुटुंबाचा आरोप आणि पोलिस कारवाई

अन्विता यांच्या वडिलांनी सांगितले की, लग्नासाठी त्यांनी २६ लाख रुपये खर्च केले होते. तसेच, पहिल्याच भेटीत पतीच्या कुटुंबाने वाहनाची मागणी केली होती. त्यांनी ती मागणी पूर्ण केली, परंतु वाहन पतीच्या नावावर होते.

पोलिसांनी पती गौरव कौशिक, त्याचे वडील सुरेंद्र शर्मा आणि आई मंजू यांच्या विरोधात IPC कलम ८५, ८० (२), ११५ (२), ३५२ आणि हुंडाविरोधी कायदा, १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

  • Related Posts

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३०…

    अंबड येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार — दोन अनोळखी व्यक्तींकडून घरफोडी करून चोरी

      अंबड तालुक्यातील एका घरात भरदिवसा घडलेली घरफोडीची घटना आज परिसरात खळबळ उडवणारी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, देवळगाव राजा तालुक्यातील रहिवासी 63 वर्षीय व्यक्ती आपल्या मुलाकडे अंबड येथे आले होते. आज…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू