धारावी पुनर्विकास : अदानीला एक इंचही जागा देणार नाही – मंत्री आशीष शेलार

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकही जागा अदानी समूहाला दिलेली नाही, असे स्पष्ट करत गृहनिर्माण मंत्री आशीष शेलार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकल्प अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईत घरे देणारा एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

धारावीतील एकूण ४३० एकरांपैकी ३७ टक्के जागा खेळ आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरण (डीआरपी) ही राज्य सरकारची कंपनी असून, धारावीच्या जमिनीचा मालक सरकारच आहे. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली गेली असल्याचा दावा चुकीचा असून, त्यासंबंधी कोणताही अधिकृत सातबारा दाखवावा, असे आव्हान शेलार यांनी विरोधकांना दिले.

डीआरपी’ ही कंपनी पुनर्विकासाचे कंत्राटदार म्हणून काम करणार आहे. निविदेनुसार मिळणाऱ्या लाभांपैकी २० टक्के हिस्सा राज्य सरकारला मिळणार आहे. धारावीतील ५० टक्के जागा ही महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मालकीची आहे. पात्र झोपडीधारकांना धारावीतच घरे दिली जाणार असून, अपात्र झोपडीधारकांना मुंबईत घरे मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी धारावी पुनर्विकासाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करू नये, असेही त्यांनी सांगितले.

Related Posts

मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पुनर्उच्चारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या उपोषणामुळे हा मुद्दा एकदाच राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा वेळी, राज्य सरकार कोणत्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

  • By Admin
  • December 15, 2025
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

  • By Admin
  • December 2, 2025
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू