पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष;पवई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘ख्वाहिश २०२५’ हा १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यभरातील ७४ महाविद्यालयांमधील तब्बल १४३८ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व कार्यक्रमांत सहभाग नोंदवला.
यंदा महोत्सवाची संकल्पना “ऐसा देस है मेरा” अशी असून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, विविधतेतील एकता आणि कलात्मक वारसा यांचे दर्शन घडवणारी ठरली.
या अंतर्गत आयोजित ३६ हून अधिक आकर्षक स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये कला, साहित्य, क्रीडा, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.
महोत्सवात परफॉर्मिंग आर्ट्स, लिटरेरी आर्ट्स, फाइन आर्ट्स, गेम्स अॅण्ड स्पोर्ट्स, इन्फॉर्मल्स, स्टार इव्हेंट्स आणि मीडिया इव्हेंट्स अशा विविध विभागांचा समावेश होता. टीचर्स गॉट टॅलेंट, फॅशन शो, मिस्टर अॅण्ड मिस ख्वाहिश, वॉर ऑफ डीजे, डीजे नाईट या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद लाभला. तसेच फोटोग्राफी, रील मेकिंग आणि शॉर्ट फिल्म मेकिंग या मीडिया स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता व सर्जनशीलता ठळकपणे समोर आली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी
व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत गोपाळ शर्मा यांच्यासोबत महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. वैशाली राजपूत,
पद्मश्री डॉ. जसपिंदर नरुला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर अभिनेत्री प्रतीक्षा मिश्रा यांनी विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाला शोभा वाढवली.
दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कलाकार शहजाद अली यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.
विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकारांना एकाच मंचावर आणणारा ‘ख्वाहिश २०२५’ हा महोत्सव केवळ स्पर्धांचा सोहळा न राहता, भारतीय संस्कृती, एकात्मता आणि तरुणाईच्या ऊर्जेचा उत्सव ठरला. पवईत रंगलेला हा सांस्कृतिक महोत्सव सहभागी विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरला.










