मुंबई, २९ मे २०२५ – जागृत महाराष्ट्र न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अंधेरी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २३ मान्यवर व्यक्ती आणि संस्थांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याची प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी लाभली. कार्यक्रमाचे आयोजन संपादक अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, कला, खेळ, कृषी आणि उद्योजकता क्षेत्रातील कार्यकर्त्यांना “जागृत पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे ठळक क्षण:
प्रत्येक पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल-श्रीफळ प्रदान करण्यात आले.
विजय पाटकर यांनी आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मनापासून अभिनंदन केले आणि अशा उपक्रमांमुळे समाजाला नवे प्रेरणास्त्रोत मिळतात, असे सांगितले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल भालेराव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हा पुरस्कार सोहळा म्हणजे समाजसेवकांच्या निस्वार्थ कार्याला दिलेली छोटीशी मान्यता आहे. अशा व्यक्तींमुळेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जागृत राहतो.”
पुरस्कारप्राप्त काही मान्यवरांची नावे:
१. गुंजनताई गोळे – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
२. नितेश कराळे मास्तर – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
३. मारुती नागोराव घोटरे – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
४. रेश्मा राजन – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
५. वैशाली अली महाडिक – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
६. रेहाना कुरेशी – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (आसरा महिला वेल्फेअर सोसायटी)
७. ऍड. शिवाजी धनगे व वनिता मॅडम – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार (जनसेवा ओल्ड एज)
८. योगेश राजेंद्र चव्हाण – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
९. बापू शांताराम परब – जागृत आदर्श कृषिमित्र पुरस्कार
१०. गायत्री विजयन नायर – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
११. झाहीद शेख – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
१२. राकेश चौधरी – जागृत आरोग्य मित्र पुरस्कार
१३. भानजी मुलजी वाला – जागृत जनसेवा पुरस्कार
१४. दीपक संदानशिव – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
१५. बलदेव खुमार – जागृत साहित्य पुरस्कार
१६. अंजली पटेल – जागृत समाजसेविका पुरस्कार
१७. लक्ष्मण डेंगळे – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
१८. संकेत माने – जागृत आदर्श लेखक पुरस्कार
१९. हरिनाथ यादव – जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार
२०. पूजा पांडे – कलाकार
२१. सबा खान – जागृत समाजसेविका पुरस्कार
२२. नीला दिगंत चंपाणेरी – जागृत समाजसेविका पुरस्कार
२३. विशाल गंगाधर दादेअड – जागृत समाजसेविक पुरस्कार
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “समाजासाठी कार्य करत राहूया” हा संकल्प करत पुरस्कार सोहळ्याची सांगता केली.