लातूर – गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रात होतोय तो राडा राडा आणि फक्त राडाच. लातुरात कोकाटेंच्या विरोधात छावा संघटनेकडून तटकरेंना भेटत त्यांच्यासमोर पत्ते फेकण्यात आले. त्यानंतर सुरज चव्हाणांना राग अनावर झाला आणि विजयकुमार घाटगेंना मारमारमारलं. दरम्यान छावा संघटनेकडून संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. लातुरात तर त्याचे पडसाद अधिक उमटले.इतकं वातावरण तापलेलं असताना सूत्रांच्या माहितीनुसार बेपत्ता असलेले मारकुटे सूरज चव्हाण अचानक रात्री पोलिसांना शरण गेले आणि पहाटे त्यांना जामीनही मंजूर झाला. लातूर पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली.
ज्या सूरज चव्हाणांचा राज्यभर निषेध होतोय, त्यांच्या अटकेची मागणी होतेय. जे सूरज चव्हाण मारहाणीनंतर बेपत्ता असतात ते स्वतः रात्री पोलिसांना शरणसुद्धा जातात म्हणजे हा घटनाक्रम पाहता पोलिसांच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोच मात्र पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का ? आणि असल्यास कुणाचा ? कारण ही गोष्ट विसरता येणार नाही की सूरज चव्हाण हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.त्यासाठी सूरज चव्हाणांना वाचवण्यासाठी खटाटोप केला जातोय का ? असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. मात्र घटनेनं पुन्हा एकदा मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.








