‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे असे आव्हान दुबे यांनी दिले होते. भाजपच्या या वाचाळवीर खासदाराला बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्‌यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
“कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? मराठी माणसांना मारण्याची भाषा कशी करु शकता? तुम्ही आपटून आपटून कोणाला आणि कसे मारणार आहात? मराठी भाषिकांच्या विरोधातील अरेरावी खपवून घेतली जाणार नाही” अशा शब्दात निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील मराठमोळ्या महिला खासदारांनी धारेवर धरल्याची माहिती आहे.

वर्षा गायकवाड यांचा संताप इतका तीव्र होता की, आजूबाजूच्या इतर राज्यांतील खासदारही क्षणभर गोंधळले. दरम्यान, “जय महाराष्ट्र”च्या जोरदार घोषणांनी लॉबी अक्षरशः दणाणून गेली. हे सगळं घडत असतानाच आसपासचे अनेक मराठी खासदारही तेथे आले आणि त्यांनीही दुबेंना जाब विचारला.

  • Related Posts

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

      मुंबई – सोमवारी रात्री उशिरा जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. स्वतः धनखड यांनी १० जुलैला झालेल्या एका कार्यक्रमात, मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त…

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    लातूर – गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रात होतोय तो राडा राडा आणि फक्त राडाच. लातुरात कोकाटेंच्या विरोधात छावा संघटनेकडून तटकरेंना भेटत त्यांच्यासमोर पत्ते फेकण्यात आले. त्यानंतर सुरज चव्हाणांना राग अनावर…

    Leave a Reply

    You Missed

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    राहुल गांधींचे मोदी सरकारवर तीव्र प्रहार: “ऑपरेशन सिंदूर” आणि ट्रम्प यांचा उल्लेख करत केला तिखट टीका

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

    “महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024” विरोधातील महाविकास आघाडीची भूमिका

    मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

    मढ बीच दुर्घटना : मृतदेह हलवण्यासाठी पोलिसांकडून ८५०० रुपये घेतल्याचा आरोप

    अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा

    अंबोजवाडीतील स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार अस्लम शेखांचा महसूल मंत्र्यांसमवेत ठाम पवित्रा