भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची चर्चा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार शुल्क आणि दंड लादला आहे.
गेल्या ३ वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असून यामुळे युरोपीय देशांनी रशियाव निर्बंध लादले. युरोपीय देश रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करत नाहीत. यामुळे, भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करत आहे, हे अमेरिका आणि युरोपला खुपलं यामुळे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड लादला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान देश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला ट्रम्प यांनी मुदतवाढ 1 ऑगस्टपर्यंत दिली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती होत नव्हती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवरुन भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.









