डोंबिवली- श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी ६७५ समाधी सोहळा डोंबिवलीत गणपती मंदिर इथे सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात नामदेव महाराजांच्या पूजेने करण्यात आली. डोंबिवली च्या नामदेव शिंपी समाजाच्या महिलामंडळाने सुश्राव्य भजन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले .
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आमदार राजेश मोरे, मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, सरचिटणीस प्रकाश पवार , सरचिटणीस आशिष राजगौर, भाजपाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले, सुनील पवार, किरण पाटील, स्मिता माळवदे, जगदाळे गुरुजी, शिक्षक व समाजसेवक गणेश हिरवे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजा अरण्यात आली. ६५ पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला , १०वी , १२ वी , १५वी , व इतर विशेष शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . तसेच लग्नाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचाही सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाला भरीव देणगी देऊन आर्थिक सहकार्य केलेल्या समाजबांधवांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी नामदेव माहाराजांचा इतिहास, त्यांचे कार्य , त्यांची भक्ती यावर माहिती दिली व समाज कल्याणावर मार्गदर्शन केले. शिंपी बिजनेस फोरमच्या कार्यकर्त्यांनीं त्यांच्या फोरम बद्दल कामकाजाबद्दल व आर्थिक बाजू सक्षमीकरण्यासाठी शिंपी बिजनेस फोरम सर्वाना कशी मदत करू शकेल याचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी कमिटी मेंबर्स , कार्यकारी मंडळ, व समाजबांधवानी हातभार लावला.









