कबुतरखान्याचा वाद अधिकच चिघळताना दिसतोय.जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन केलं. मात्र, गोवर्धन देशमुख यांनी दादर कबुतरखान्याच्या परिसरात पाऊल ठेवताच पोलिसांच्या एका तुकडीने त्यांना गराडा घातला आणि काही कार्यकर्त्यांना, गोवर्धन देशमुखांना ताब्यात घेतलं. एकच गोंधळ झाला मात्र हा प्रश्न उपस्थित होतोच 6 ऑगस्टला जैनधर्मीयांनीही याच ठिकाणी आंदोलन केलं होतं. महापालिकेमार्फ़त लावलेली ताडपत्री फाडण्यात आली मग त्यांची धरपकड का झाली नाही, त्यांच्यावर कारवाई का झाली नाही. असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होतात. दरम्यान मराठी माणसाचं रक्त काढलंय, 6 ऑगस्टला तुम्ही कुठे होतात, असा सवाल मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी केला.पोलिसांनी आज सकाळपासूनच दादर कबुतरखान्याच्या परिसरात अतिरिक्त कुमक मागवून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या परिसरातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते याठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना पकडून गाडीत कोंबायला सुरुवात केली. गोवर्धन देशमुख यांना अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेले. निमित्त कबुतरखान्याचं असलं तरी याला रंग दिलाय जातोय का ? सरकारबाबत कोणता ठोस निर्णय घेतंय ? कबुतरांमुळे निष्पन्न होणाऱ्या आजारांचं काय ? हे मुद्दे लक्षात घेणं तितकंच गरजेचे आहेत
मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर
मुंबईतील नामांकित शाळेतील ४० वर्षीय इंग्रजी शिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात…










