मुंबई-आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यातच यंदा विक्रमांच्या शर्यतीलाच उधाण आलं आहे. घाटकोपरमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचना विश्वविक्रम केला आहे. मात्र जय जवान गोविंदापथकाआधी ठाण्यात कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांचा विश्वविक्रम रचला. पण काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकाने तोच विक्रम गाठत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. अनेक दिवसांपासून सर्वाधिक थर लावण्याचा सराव करणारे गोविंदा पथक आज विविध ठिकाणी थर लावून बक्षीस मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजित केले जात आहेत.









