गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आहे. लालबागच्या राजाचा प्रवेशद्वारही सजलाय. लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारावर भलामोठा हत्तीचा देखावा उभारण्यात आलाय. महादेवी हत्तीणीचा मुद्दा राज्यात तापला असतानाच हा हत्तीचा भव्यदिव्य देखावा साकारण्यात आलाय. खरंतर जी महादेवी हत्तीण अंबानींच्या वनतारात आहे त्याच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटे मुलगा अनंत अंबानी यांचे लालबागच्या राजाशी खूप जुने नाते आहे. अनंत अंबानी लबाग राजा मंडळाचे मानद सदस्य आहेत. गेल्या वर्षी अनंत अंबानी यांनी 20 किलो सोने असलेला राज मुकुट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. या मुकूटाची किंमत 16 कोटी होती. महादेवी हत्तीण अंबानींच्या वनतारामध्ये नेताच कोल्हापूरकरांनी अंबानींचा आणि जिओवर बहिष्कार टाकला होता. संपूर्ण देशभरात महादेवी हत्तीणीचा विषय गाजला. कोल्हापूरकरांनी सुरु केलेली मोहीम इतकी लक्षवेधी ठरली कि वनताराच्या अधिकाऱ्यांनाच कोल्हापुरात यावं लागलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजिक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तिणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीसुद्धा वनताराने दर्शवली. महादेवी हत्तिणीमुळे जनभावना दुखावल्या आता त्याची परतफेड करण्यासाठी अनंत अंबानींनी हत्तीवर एकूणच प्राण्यांवर किती प्रेम आणि काळजी आहे असा दाखवण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येत असल्याची चर्चा आहे









