बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरात असंतोष व्यक्त होत असतानाच बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरत खरसाडे या तरुणाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत खरसाडे याला मुंबईला जाण्याची इच्छा होती. मात्र, खिशात पैसे नसल्याने तो नैराश्यात गेला. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, रोजगार व शिक्षणात आरक्षणाच्या अभावामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरत आहे. भरतच्या मृत्यूमुळे मराठा समाजात तीव्र भावना उमटल्या आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या समाजनेत्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “आम्ही मैदानावर लढत आहोत, त्यामुळे कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये.”










