बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान चढलं आहे! राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत — पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
या निवडणुकीकडे केवळ बिहारच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे नागरिकांमध्येही या प्रक्रियेबद्दल नाराजी दिसून येते. अनेकांना वाटतं की निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि नागरिककेंद्री व्हायला हवी.
राज्यातील मतदार आता सरकारच्या कारभाराकडे बारकाईने पाहत आहेत. कारण निवडणुकीनंतर अनेक वेळा सरकारचे धोरणे बदललेली दिसतात, तसेच दिलेली आश्वासने पूर्ण होत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.
आता पाहायचं हेच की या निवडणुकीत जनता नेमका कोणता निकाल लावते आणि बिहारमध्ये पुढचा राजकीय अध्याय कोणत्या दिशेने जातो.
🗳️ जनता सज्ज आहे — बदलासाठी की पुन्हा त्याच सत्तेसाठी?
१४ नोव्हेंबरला मिळेल याचं उत्तर.. .https://amzn.to/4h19ZRQ








