रविवार दिनांक 16. 11. 2025 रोजी रात्री 11 वाजता कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुसगाव पुणे येथे राहत्या घरी दुःखद निधन झाल आहे. कै. शांताबाई हरिश्चंद्र चव्हाण या महिला पूर्वीपासूनच बांधकाम व्यवसायिक होत्या. समाजामध्ये सामाजिक काम तसेच आध्यात्मिक कामाची शांताबाई यांना मोठी ओढ होती. चेहरा सतत हसरा, मनमिळावू शांत स्वभाव असणाऱ्या शांताबाई चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण परिवाराच्या देवघरातील देव्हारा रिता झाला आहे. कै.शांताबाई चव्हाण यांच्या पाश्चात त्यांना तीन मुले व सात नातवंड असा मोठा परिवार असून थोरला मुलगा राजेंद्र चव्हाण हे राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये सुप्रिडंट ऑफिसर आहेत, मधला मुलगा महेंद्र चव्हाण मराठवाडा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर धाकटा मुलगा रवींद्र चव्हाण कोकणामध्ये महाड येथे शिक्षण संस्था चालक आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र बेलदार समाज संघटना अध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तीन मुलं, तीन सुना, सात नातवंड असा मोठा परिवार कै. शांताबाई चव्हाण यांचा आहे. 16 नोव्हेंबर रोजी कै.शांताबाई चव्हाण यांचं निधन झाल असून शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी पुणे, सुसगाव, भैरवनाथ मंदिरासमोर राहत्या घरी उत्तर कार्य आहेत.











