 
									रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज मोठ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यशवंतराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.
या समारंभात शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंतराव यांच्या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला रत्नागिरीत बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे

 Pankaj Helode
Pankaj Helode









