रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची चर्चा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार शुल्क आणि दंड लादला आहे.
गेल्या ३ वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असून यामुळे युरोपीय देशांनी रशियाव निर्बंध लादले. युरोपीय देश रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करत नाहीत. यामुळे, भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करत आहे, हे अमेरिका आणि युरोपला खुपलं यामुळे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड लादला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान देश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला ट्रम्प यांनी मुदतवाढ 1 ऑगस्टपर्यंत दिली होती. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती होत नव्हती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवरुन भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.

  • Related Posts

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आयोजित बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाड तालुक्यातील भिवघर शाळेचे मुख्याध्यापक व बी.एल.ओ.  रुपेश राजू पार्टे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. दि. ३…

    रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची मुंबई-जॉर्डन थेट विमानसेवा सुरू; आठवड्यातून चार फेऱ्या

    मुंबई विमानसेवा, रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्स, जॉर्डन थेट फ्लाइट, Queen Alia Airport, Petra Jordan, India Jordan Flights, New International Flight Indiaभारत-जॉर्डनमधील पर्यटन व व्यापार वाढीस चालना; प्रवास होणार अधिक सोयीस्कर मुंबई…

    Leave a Reply

    You Missed

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    ‘मातोश्री’वर बंधूप्रेम

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    केतकीचं बरळणं केवळ प्रसिद्धीसाठी ?

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    गुन्हा मागे, भाजपात एंट्री

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    उच्च न्यायालयाला ‘सर्वोच्च’ दणका

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    ‘पटक-पटक’ बोलणाऱ्या दुबेंना संसदेत महाराष्ट्राच्या रणरागिनींनी झापलं! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दणाणल्या!

    उपराष्ट्रपतीपदी ‘नितीश’?

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    श्रावणात घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद! शिवभक्तांना पांढरी फुले, बेलफूल, धोत्रा वाहण्याची मुभा; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय…

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?

    सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?