पुणे शहरातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या २४ वर्षीय गौतम गायकवाड बेपत्ता झाल्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली होती. मुळचा साताऱ्याचा गौतम गायकवाड हा हैदराबादहून आपल्या मित्रांसमवेत सिंहगडावर फिरायला गेला होता. ‘लघुशंका करुन येतो’, असं मित्रांना सांगून तो गेला, पण पुन्हा परतलाच नाही. मित्रांनी शोधाशोध केली असता, त्यांना गडावरील तानाजी कडा येथे त्याची चप्पल आढळली. त्यावरुन असं समजलं की तो, तानाजी कडावरुन खाली दरीत कोसळला आहे. एनडीआरएफ, अग्निशामक दल, वन विभाग आणि पोलिसांनी सलग शोधमोहीम हाती घेतली. मात्र, तरीही त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात तो दिसल्याचा दावा झाल्यानं या प्रकरणात अधिकच गूढ वाढलं. २० तारखेला बेपत्ता झालेला गौतम गायकवाड़ २४ तारखेला सापडला. इतके दिवस गौतम गायकवाड होता कुठे ? त्याचा शोध लागला कसा तो खरंच कड्यावरून पडला कि त्याने दिलेला चकवा होता असे एक नव्हे अनेक प्रश्न आहेत.
२० ऑगस्टच्या संध्याकाळी तो हैदराबाद वरून सिंहगडावर आला होता महेश शिंदे, हिमांशू शुक्ला ,वैष्णवी अलगुडे आणि सुरज माळी हे त्याचे मित्रमैत्रिणीसुद्धा त्याच्या सोबत होते.संध्याकाळी ४.३० च्या सुमारास किल्ला फिरल्यावर हॉटेलमध्ये जेवल्यावर हे मित्र तानाजी कड्याजवळ आले.तेव्हा गौतमने आपला मोबाइल मित्राकडे दिला आणि मी लघुशंका करून येतो असं सांगितलं आणि गौतम बराच वेळ आलाच नाही. मित्रांना गडावरील तानाजी कडा येथे त्याची चप्पल आढळली. तानाजी कडावरुन खाली दरीत कोसळल्याचा संशय आला आणि त्याच्या मित्रांनी लगेचच पोलिसांना कळवलं. त्यांनतर सुरु झाला गौतमचा शोध. खोलवर दरीत उतरून गौतमच्या शोध घेण्यात आला. अगदी रविवारी संध्याकाळपर्यंत गौतमचा शोध घेण्यात आला. तरीही गौतमचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अशातच एक सीसीटीव्ही हाती आलं ज्यात सिंहगडाच्या पायथ्याला एक तरुण हुडी घालून लपत चालताना दिसला. हा गौतमच असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हा दावा गौतमच्या कुटुंबीयांनी फेटाळला. आता गौतम सापडण्याच्या सगळ्या अशा संपुष्टात येत चालल्या होत्या. तितकत्यातच रविवारी संध्याकाळी जिवाच्या आकांताने ओरडताना तो पर्यटकांना तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ सापडला आणि या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण आलं.
स्थानिकांनी गौतमला घरी आणलं. थंडीने कुडकुडत असलेल्या गौतमला त्यांनी प्राथमिक उपचार दिले.पोलिसांना गौतम सापडल्याचं कळताच त्यांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवलं. गौतम बोलण्याच्या मनस्थितीत आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. गौतमने माध्यमांशी बोलताना काही दावे केले. त्याने केलेल्या दाव्यानुसार तो किल्ल्याच्या कड्यावरून खाली पडला होता. तो कड्याजवळ आला तेव्हा त्याला कुत्रा दिसला. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कुत्रा आणि गौतम दोघेही खाली पडले चार दिवस त्याने वर येण्याचा प्रयत्न केला पण त्याला वर येण्याचा रस्ता सापडलाच नाही त्याने मदतीसाठी आवाज दिला पण तो कुणापर्यंत पोहोचलाच नाही. गवत, दगडांच्या आधाराने तो तिथेच झोपून राहायचा. इतके दिवस अन्नाचा कणही त्याच्या पोटात गेला नाही. त्याला पाण्याचा थेंबही मिळाला नाही. तो उठला कि रस्ता शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याने वर येण्याचा प्रयत्न केला. पण अंगात त्राण न उरल्याने हे प्रयत्न त्याचे निष्फळ ठरत होते. रविवारी पूर्ण ताकदीनिशी तो गड चढला आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. पण त्याने केलेले दावे संशयास्पद असल्याचं वाटू लागले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमने ज्या कड्यावरून पडल्याचा दावा केला तिथे मोठ्या प्रमाणावर गवत आहे. त्याचा शोध घेतांना अगदी पहिल्या दिवशीही गवत जशच्या तसं होतं. इथून साधा दगड तरी खाली टाकला तरी गवत आडवं होतं मग माणूस पडल्यावर गवत तसंच कसं राहीलं. सिंहगडावर इतकी थंडी आहे कि तासाभरसुद्धा उबदार कपड्यशिअवय इथे राहणंच कठीण आहे.मग इतके दिवस गौतम कसा काय राहिला. गौतमच्या शोधासाठी अनेक पथकं आणि लोक दरीत उतरली होती. जर गौतम आवाज देत होता तर त्यांना आवाज कसा काय ऐकू आला नाही. गौतम बेपत्ता झाला होता तेव्हा त्याला दाढी मिशीसुद्धा होती आणि तो सापडला तेव्हा त्याने क्लीन शेव केली होती. जर तो इतक्या दिवस जंगलात होता तर त्याने क्लीन शेव कशी केली तेही इतकी नीट. या सगळ्यावरून गौतमने हा स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा संशय बळावला. गौतमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम बेपत्ता झाल्यावर त्यांना गौतमने आमच्याकडून आठ लाखाचं, १० लाखाचं कर्ज घेतलं होतं अशी फोन आल्याची माहिती दिली होती. त्यामुळेच कर्जाचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता अशी माहिती मिळतेय.










