संगीतकार आणि गीतकार विराग मधुमालती यांनी आपले नाव जागतिक पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
त्यांच्या कामगिरीतून संगीताची नवनवीन रूपे जगासमोर येत आहेत.
सर्वप्रथम त्यांनी “डोळे माणसांनी दान केले पाहिजेत” या सामाजिक संदेशासाठी जनजागृती मोहीम उभारली. त्यानंतर 500 कलाकारांना एकत्र करून संगीत मॅरेथॉन आयोजित केली. पुढे 153 तबला वादकांना घेऊन टीव्ही आणि वॉर रेकॉर्ड प्रस्थापित केला.
याचबरोबर 327 कलाकारांना एकत्र करून एका सिनेमासाठी गीत रचले. चीनमध्ये 1000 कलाकारांसह सलग 38 दिवस गाणे गात राहण्याचा विक्रम केला. तसेच 1305 किलोमीटर चालत वृक्षलागवड करण्याची अनोखी मोहीम ही यशस्वीरीत्या पार पाडली.
लोणावळा येथे त्यांनी केवळ 93 सेकंदात ‘शिव तांडव स्तोत्र’ गायन करून “वर्ल्ड्स फास्टेस्ट शिव तांडव स्तोत्रम्” या विक्रमात आपले नाव नोंदवले. हा मान वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये समाविष्ट झाला आहे.
विराग मधुमालतींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. सतत चार वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे यश मिळाले असल्याचे ते सांगतात. “शिव साधनेतून मला हे यश लाभले आहे, आज जागतिक पातळीवर माझे आणि माझ्या परिवाराचे नाव झाले हेच मोठं समाधान आहे” असे त्यांनी अभिमानाने व्यक्त केले.
येत्या काळात ते 40 फूट लांबीचे, तब्बल 2 लाख पानांचे संगीत पुस्तक तयार करत आहेत. हे पुस्तक पूर्ण करून आणखी एक विक्रम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
या सर्व प्रवासात त्यांनी स्पष्ट केले की, देश व सरकारने अशा प्रयत्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण हे विक्रम केवळ वैयक्तिक नसून भारताच्या संस्कृतीचे जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधित्व करतात.








