मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प.उ.१ विभागातील उप-प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमेव फोटो लावण्यात आलेला आहे. या गोष्टीमुळे प्रशासनिक तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये सामान्यतः महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांचे फोटो लावले जातात. मात्र, प्रवेशद्वाराबाहेर फक्त एका राजकीय नेत्याचा फोटो लावणे हे राजकीय प्रचाराचा आभास निर्माण करणारे ठरू शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
शासकीय सेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक असल्याचे नियमांमध्ये स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणात नियमभंग होत आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.








