चारित्र्याच्या संशयाने पेटलेलं मन, पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न..

मुंबईवांद्रे पूर्व परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या २३ वर्षीय पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना घडली. यात संबंधित महिला गंभीर भाजली असून तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी महिलेचे नाव सिमरन सलमान कुरेशी (२३) असे असून त्या वांद्रे पूर्वेतील बेहरामपाडा येथील लकडेवाला गल्लीत पतीसह वास्तव्यास होत्या. पती सलमान इरशाद कुरेशी (३४) हा कपड्यांचा व्यवसाय करतो.

सतत वाद आणि संशय

२१ मार्च रोजी सिमरन आणि सलमान यांच्यात घरगुती वाद झाल्यानंतर संतापलेल्या सलमानने पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने घरातील रॉकेल आणून सिमरनच्या अंगावर ओतले आणि माचिसची काडी पेटवत तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर गंभीर भाजलेल्या सिमरनला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ती सध्या ४५ टक्के भाजली असून तिची स्थिती गंभीर पण स्थिर आहे.

आईच्या जबाबानंतर उघड झाला प्रकार

उपचारादरम्यान मुलीची स्थिती थोडी स्थिर झाल्यानंतर तिच्या आईने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. आई गौरी कुरेशी (४५) यांच्या जबाबावरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात आरोपी सलमान विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पती अटकेत

या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम १०९, ७९, ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा याआधीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  • Related Posts

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    वई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी ख्वाहिश २०२५ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्वरूप असलेल्या या…

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    अखेर राज्यातील नागरिकांची गेल्या चार वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष