पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष;पवई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘ख्वाहिश २०२५’ हा १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यभरातील ७४ महाविद्यालयांमधील तब्बल १४३८ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व कार्यक्रमांत सहभाग नोंदवला.

यंदा महोत्सवाची संकल्पना “ऐसा देस है मेरा” अशी असून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, विविधतेतील एकता आणि कलात्मक वारसा यांचे दर्शन घडवणारी ठरली.

या अंतर्गत आयोजित ३६ हून अधिक आकर्षक स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये कला, साहित्य, क्रीडा, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.

महोत्सवात परफॉर्मिंग आर्ट्स, लिटरेरी आर्ट्स, फाइन आर्ट्स, गेम्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स, इन्फॉर्मल्स, स्टार इव्हेंट्स आणि मीडिया इव्हेंट्स अशा विविध विभागांचा समावेश होता. टीचर्स गॉट टॅलेंट, फॅशन शो, मिस्टर अ‍ॅण्ड मिस ख्वाहिश, वॉर ऑफ डीजे, डीजे नाईट या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद लाभला. तसेच फोटोग्राफी, रील मेकिंग आणि शॉर्ट फिल्म मेकिंग या मीडिया स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता व सर्जनशीलता ठळकपणे समोर आली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी
व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत गोपाळ शर्मा यांच्यासोबत महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. वैशाली राजपूत,
पद्मश्री डॉ. जसपिंदर नरुला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर अभिनेत्री प्रतीक्षा मिश्रा यांनी विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाला शोभा वाढवली.

दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कलाकार शहजाद अली यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकारांना एकाच मंचावर आणणारा ‘ख्वाहिश २०२५’ हा महोत्सव केवळ स्पर्धांचा सोहळा न राहता, भारतीय संस्कृती, एकात्मता आणि तरुणाईच्या ऊर्जेचा उत्सव ठरला. पवईत रंगलेला हा सांस्कृतिक महोत्सव सहभागी विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरला.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध् डिजीटलच्या मोठ-मोठ्या गप्पा मारल्या जात असून आता मात्र त्याच शाळेची दुरावस्था…

Leave a Reply

You Missed

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल