दुरावस्थेचा कळस!भितींमधून पाणी,वर्गात बसणं अशक्य…अखेर शाळेच्या छप्परावर प्लास्टिक टाकण्याची वेळ!

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध् डिजीटलच्या मोठ-मोठ्या गप्पा मारल्या जात असून आता मात्र त्याच शाळेची दुरावस्था अन् विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडालेला दिसतो.बापवली येथील जिल्हा परिषद शाळेची पुर्णत: दुरवस्था झाली असून पावसामुळे शाळेच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे. छतातून सतत पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे निव्वळ अशक्य झाले होते.

 शाळेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार
​
शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अखेर बापवली गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत.संपूर्ण शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकले आहे.प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेलं हे पाऊलं खरतंर प्रशासनाने घेणं आवश्यक होतं. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना स्वत:च या मोहिमेत उतारवं लागलं.

​शाळेवर प्लास्टिक टाकण्याची वेळ

सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर आता या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “एकीकडे कोट्यवधींच्या विकासाच्या बाता मारायच्या, मोठ्या राजकीय घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र मतदारसंघातील हक्काच्या सरकारी शाळेला गळती लागल्यावर तिथे प्लास्टिक टाकण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?” असा संतप्त सवाल आता मतदार आणि सामान्य नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रशासनासाठी खरंच महत्त्वाचा आहे का?

दरम्यान याबाबत प्रशासनाकडून आता काय पाऊले उचलली जातायत का? या समस्येची दखल घेतली जाणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हा फक्त शाळेच्या सविकासाचा प्रश्न नाहीये तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

Leave a Reply

You Missed

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच