‘बाप्पाकडे एकच प्रार्थना…’ केतन अग्रवालच्या बहिणीचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, सियाबद्दलही केला मोठा खुलासा

पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवालची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजी हत्या केल्याचा आरोप आहे. आज म्हणजे १८ जुलै २०२६ रोजी केतनच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. अशात केतन अग्रवालचे संपूर्ण कुटुंब पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला साकड घालण्यासाठी आलेलं. यावेळी केतनच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.

‘आज माझ्या भावाला एक महिना पूर्ण झाला…’

केतन अग्रवाल याची बहीण म्हणाली, “आज माझ्या भावाला एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिना झाला, मी त्याला पाहिलं नाही. त्याचा आवाज ऐकला नाही आणि त्याचं हसू मला ऐकायला आलं नाही.. माझी फक्त गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे की, माझ्या भावाला लवकरत लवकर न्याय मिळायला हवा आणि तो आता जिथे कुठे आहे, तिथे शांतीने जगू शकेल. त्याने आनंदी राहवं एवढीच इच्छा आहे.”

सर्व गोष्टींचा खुलासा ट्रायलमध्ये होईल

तसेच ती पुढे म्हणाली, “आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे आणि भावाच्या मृत्यूला देखील एक महिना झाला आहे. हे दुःख आमच्या कुटुंबासाठी फार मोठं आहे” एवढंच नाही तर, सियावर संशय कसा आला? असा प्रश्न देखील माध्यमांकडून तिला विचारण्यात आला. यावर केतनच्या बहीणीने प्रतिक्रिया देत म्हटलं की,”या सर्व गोष्टींचा खुलासा ट्रायलमध्ये होईल, आता आम्ही गणराया चरणी फक्त एवढीच प्रार्थना करत आहोत की, केतन याला न्याय लवकरात लवकर मिळायला हवा.” दरम्यान पोलीस देखील याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात कोर्टात चालवलं जात आहे. तर सियाच्या पालकांकडून सतत वकील बदलले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले, ‘जे माझ्या मुलासोबत झालं आहे, असं कोणाच्याच मुलासोबत नाही झालं पाहिजे… न्यायव्यवस्थेकडे माझी एकच मागणी आहे आणि ती म्हणजे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. ही शिक्षा लवकरात लवकर मिळावी. मी पंतप्रधानांना पत्र लिहून एवढीच मागणी केली आहे की, लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.’

त्यामुळे आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होणार, कोणती रहस्ये समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

आयआयटी मुंबई येथील अनुसूचित जातीतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संस्थात्मक हत्येच्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आमदार असलम शेख, खासदार प्रा.वर्षाताई गायकवाड आणि आमदार…

मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

मेरठमधील प्रसिद्ध निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणामुळे सर्वांनाच हादरवलं होतं.पतीची हत्या करून पत्नीने त्याचा मृतदेह आपल्या प्रियकराच्या मदतीने निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता. या प्रकणाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली…

Leave a Reply

You Missed

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

“साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच